Saturday, August 6, 2011



बाजीबुवा तांबे हे श्रीनारायणस्वामींचे परमभक्त होते.जातीने कुणबी असले तरी नारायणस्वामी त्याला विशेष मानत होते.त्यांच्या वंशजांची बरीच घरे आजही शिरवळला आहेत.शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे.


श्रीराममंदिराशेजारी एका छोट्याशा कौलारुवजा जागेत बाजीबुवांची समाधी होती.अलिकडेच चांगले दगडी मंदिर बांधून त्याभोवती फरसबंध आवार व गेट करण्यात आले आहे.मार्गशीर्ष वद्य अष्टमीला त्यांची पुण्यतिथी साजरी करीत असत.